आमच्याबद्दलडिजिटल कामात
डिजिटल कामात
माणुसकी आणि स्पष्टता.
आम्ही आधी तुमचा व्यवसाय समजून घेतो. मग योग्य डिजिटल उपाय निवडतो. प्रत्येक गोष्टीला मोठमोठी आश्वासनं देण्यापेक्षा, काय शक्य आहे ते प्रामाणिकपणे सांगतो.
आम्ही कसं काम करतो?
Arovam Digital ही व्यवसायांना ऑनलाइन उपस्थिती मजबूत करण्यासाठी मदत करणारी डिजिटल सेवा संस्था आहे. वेबसाइट, शोधयंत्रातील उपस्थिती, सोशल मीडिया, जाहिराती आणि कंटेंट—या सगळ्यांचा उपयोग तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टानुसार करायचा, हा आमचा दृष्टिकोन आहे.
तुमच्याकडे आधीपासून वेबसाइट किंवा सोशल मीडिया पेज असेल, तरी सुरुवात तिथूनच करता येते. काय चांगलं चाललंय, कुठे अडचण आहे आणि पुढे कोणता बदल उपयोगी ठरेल, हे एकत्र पाहू.
आमची काही तत्त्वं
- ✓ बोलण्यात स्पष्टता आणि कामात पारदर्शकता
- ✓ गरज नसलेली सेवा किंवा खर्च सुचवायचा नाही
- ✓ कामाच्या प्रगतीबद्दल नियमित संवाद
- ✓ आकडे आणि प्रत्यक्ष कामगिरीकडे लक्ष
